राज्यातील आजचा पेट्रोल-डिझेल भाव काय? जाणून घ्या

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. देशात सलग एकोणवीसाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल केलेला नाही. यापूर्वी २१ मे रोजी केंद्र सरकारनं पेट्रोल -डिझेलच्या किमतींमध्ये घट करत सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला होता. तेव्हापासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. २१ मे रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील ८ रुपये आणि डिझेलवरील ६ रुपयांचं उत्पादन शुल्क हटवलं होतं. त्यानंतर देशात पेट्रोल ९.५० रुपये आणि डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झालं होतं.

पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार, आज मुंबईत पेट्रोलचा दर १११.३५ रुपये तर डिझेलचा दर ९७.२८ रुपये प्रतिलिटर आहे. त्याच वेळी, पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर १११.९३ रुपये तर डिझेलचा दर ९५.७३ रुपये प्रति लिटर आहे. तर नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर १११.४१ रुपये तर डिझेलचा दर ९५.९२ रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकरे तपासा

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून ९२२४९९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.

Share