“तुम्हें हम भी सताने पर उतर आएं तो क्या होगा?” राऊतांचे ट्वीट

मुंबई : शिवसेना नेते खा. संजय राऊत आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद असून यावेळी ते काय नवा गौप्यस्फोट करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मात्र त्यापूर्वीच सेनेच्या नेत्यांवर मुंबईत आज केंद्रीय यंत्रणांकडून धाडसत्र टाकण्यात आले. त्यामुळे राजकीय वातावरण तापले असतानाच आता संजय राऊत यांनी नवीन ट्वीट केले आहे.

संजय राऊत यांनी ट्वीट मध्ये म्हटंल आहे की. “तुम्हें हम भी सताने पर उतर आएं तो क्या होगा, हमें बदनाम करते फिर रहे हो अपनी महफ़िल में…अगर हम सच बताने पर उतर आएं तो क्या होगा..? आज चार वाजता, शिवसेना भवन”, असे ट्वीट करत संजय राऊत यांनी नेमका कोणाला इशारा दिला आहे पत्रकार परिषदे समजणार आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. अशातच महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या नेत्यांवरही केंद्रीय तपास यंत्रणांची नजर असून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांच्या मागे येत्या काही दिवसांत कारवायांचा सपाटा लागणार असल्याची सूचक वक्तव्य अनेक भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत.

 

Share