‘तात्या कधी येताय…वाट पाहतोय’, मोरेंना पवारांकडून ऑफर

पुणे : मनसेचे पुण्यातील फायरब्रँड नेते वसंत मोरे यांना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काॅँग्रेस पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. पुण्यातील एका लग्नात अजित पवारांनी वसंत मोरेंना ही ऑफर दिली आहे. पुण्यातील एका लग्नात अजित पवारांनी वसंत मोरेंना ही ऑफर दिली आहे. ‘तात्या, कधी येताय, वाट पाहतोय,’असे म्हणत अजित पवार यांनी वसंत मोरेंना खुली ऑफरच दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मनसेचे नेते वसंत मोरे हे पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या समवेत भेट झाली होती. वसंत मोरे नाराज असल्याने ते मनसेला रामराम करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात काही दिवसांपासून आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्यासंदर्भात भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी त्याला विरोध केला होता. तेव्हापासून शहर पदाधिकारी विरोधात वसंत मोरे असे चित्र दिसण्यास सुरुवात झाली आहे. मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसनेही यापूर्वी पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते.

राष्ट्रवादीकडून ऑफर आल्याचं मोरेंनी मान्य
अजित पवार यांनी जाहीर नियमंत्रण दिल्याला वसंत मोरे यांनी ही दुजोरा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते अशी विचारणा करतात, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. तसेच माझ्या कार्याचीही पावती आहे. मात्र मनसे सोडण्याबाबत मी विचार केलेला नाही. असे वसंत मोरे यांनी सांगितले आहे.

Share