मुंबई : गेल्या काही दिवसांपासून किरण माने यांच नाव सगळीकडे चर्चेत आहे. सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेतल्यानं अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढण्यात आलं. या घटनेचे पडसाद आता सोशल मीडिया, मनोरंजन क्षेत्रासह राजकीय पटलावरही उमटू लागले आहेत. आता यावर भाजप नेते चित्रा वाघ यांनी किरण माने यांच्यावर टिका केली आहे. ‘मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी किरण मानेने गैरवर्तन केलं. म्हणून त्याला प्रोडक्शन हाउसनं हाकलून दिलं. त्यानंतर मानेनं नवं नाट्य उभं केलं’, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. ‘किरण मानेचा बोलवता धनी कोण?’, असा सवालही त्यांनी विचारला आहे. ‘या सोंगाड्यावर कारवाई करा, त्याला शिक्षा झालीच पाहीजे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी गैरवर्तन करणा-या किरण मानेला प्रोडक्शन हाउसनं हाकलून दिलयं..मग मानेनं नवं नाट्य उभं केलं
महिलांचा विनयभंग व PM वर विखारी टिका करणा-या हरामखोराला सत्ताधारी पाठीशी घालताहेत
कोण आहेत मानेचे बोलवते धनी ??
या सोंगाड्यावर कारवाई करा
शिक्षा झालीचं पाहीजे— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 17, 2022
काय म्हणाल्या चित्रा वाघ
‘मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी किरण मानेने गैरवर्तन केलं. म्हणून त्याला प्रोडक्शन हाउसनं हाकलून दिलं. त्यानंतर मानेनं नवं नाट्य उभं केलं’, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. सोबतच, महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (pm narendera modi) विखारी टिका करणाऱ्या किरण मानेला सत्ताधारी पाठिशी घालत आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. ‘किरण मानेचा बोलवता धनी कोण?’, असा सवालही त्यांनी विचारला आहे. ‘या सोंगाड्यावर कारवाई करा, त्याला शिक्षा झालीच पाहीजे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
नेमक प्रकरण काय
स्टार प्रवाहवरच्या ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील ही भूमिका करणारे अभिनेते किरण माने यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. त्यानंतर काही दिवसात किरण माने यांना त्या मालिकेतून काढून टाकण्यात आलं. आपण ही फेसबुक पोस्ट लिहिल्याने आपल्याला मालिकेतून काढलं गेलं, असा आरोप किरण माने यांनी केला. त्यावर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.