पंडित बिरजू महाराज काळाच्या पडद्याआड

दिल्ली- पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. दिल्लीत  त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. महाराजांच्या निधनाची माहिती त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

कथ्थक सम्राट बिरजू महाराज यांच्या निधनाने संगीत जगताची मोठी हानी झाली आहे. कथ्थकचा समानार्थी शब्द असलेले बिरजू महाराज हे देशातील प्रसिद्ध शास्त्रीय नर्तक होते. ते भारतीय नृत्याच्या कथ्थक शैलीचे मास्टर आणि लखनौच्या ‘कालका-बिंदादिन’ घराण्याचे प्रमुख होते.

अनेक नृत्यप्रकारात पारंगत- 

बिरजू महाराजांनी गोवर्धन लीला, माखन चोरी, मालती-माधव, कुमार सम्भाव आणि फाग बहार इत्यादी विविध प्रकारच्या नृत्यप्रकारांची रचना केली. सत्यजित रॉय यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटासाठी त्यांनी उच्च दर्जाच्या दोन नृत्यनाट्यांची रचना केली. तबला, पखवाज, ढोलक, नाल आणि तंतुवाद्य, व्हायोलिन, स्वर मंडळ आणि सतार इत्यादी तालवाद्यांचे त्यांना विशेष ज्ञान होते.

 

 

Share