धमकी कोणाला देतोय? आमच्या नादाला लागल्यावर आम्ही बैल नांगरसकट लावतो

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज हे लवकरच पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा भांडाफोड करणार असल्याचं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा तो नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटायला जाईल, असा इशारा कंबोज यांनी ट्विटमधून दिला. मोहित कंबोज यांच्या ट्विटनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस कमालीची आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी मोहित कंबोज यांना थेट इशारा दिला आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं की, मोहित कंबोज यंत्रणेला हाताशी धरून धमकी कोणाला देतोय? आमच्या नादाला लागल्यावर आम्ही बैल नांगरसकट लावतो. तुझी सत्तेची मस्ती आणि माज उतरावयला वेळ लागणार नाही. आ देखे जरा किसमें कितना है दम’, अशा आशयाचे ट्विट करत सुरज चव्हाण यांनी मोहित कंबोज यांना थेट इशारा दिला आहे.

 

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही कंबोज यांच्या ट्विटचा समाचार घेतला आहे. मिटकरी म्हणाले म्हणाले की, मोहित कंबोज आहे कोण? तो कोणाच्या इशाऱ्यावर काम करतो, हे महाराष्ट्राला माहीत आहे. लष्करे देवेंद्रमधील हा तिसरा आहे. हा भाजपाचा भोंगा आहे. जीएसटी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का तो बोलत नाही, असा सवाल करत मोहित कंबोजचीदेखील चौकशी झाली पाहिजे. ईडी कुठे धाड टाकत आहे, हे जर त्याला माहीत असेल तर मग त्याची चौकशी झाली पाहिजे. मोहित कंबोज हा ईडीचा चौकीदार आहे का?” असा संतप्त सवाल करत कंबोज यांच्या चौकशीची मागणी मिटकरी यांनी केली.

Share