‘आई लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते , धरणीची ठाय असते.’ आई शिवाय कोणतीही गोष्ट जणू अशक्य आहे. पण असं असूनही तिलाच आपण सर्वात जास्त गृहित धरतो. आईचं महात्म्य जोपासण्यासाठी दरवर्षी एक विशिष्ट दिवस हा मदर्स-डे म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे. पाश्चात्य देशांमध्ये मे महिन्याचा दुसरा रविवार हा मदर्स-डे म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे यंदा मदर्स डे हा ८ मे २०२२ रोजी साजरा केला जाणार आहे.
१९०८ मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती वुड्रो विल्सन यांनी एक कायदा बनवला, ज्या अंतर्गत दरवर्षी मे महिन्याच्या दुस-या रविवारी ‘मदर्स डे’ साजरा केला जातो. प्रत्येक देशानुसार मदर्स डे सेलिब्रेशनच्या तारखा वेगवेगळ्या आहेत. भारतात महात्मा गांधीजींची पत्नी कस्तुरबा गांधी यांच्या सन्मानार्थ मदर्स डे साजरा केला जातो. २००३ मध्ये ११ एप्रिलला कस्तुरबा गांधीच्या जयंती दिवशी भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षित मातृदिन साजरा करण्याची घोषणा केली होती. आईचं प्रेम, वात्सल, त्याग, वेदना लक्षात घेण्यासाठी, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस तर असायलचा हवा. त्यामुळेचं मदर्स डे साजरा केला जातो. यानिमित्त आईला गिफ्ट देण्याची पद्धत आहे. तिच्यासाठी काही वस्तू बनवल्या जातात. आईप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी हा दिवस खास असतो.