निवडणुका नसताना उगाच कशाला भिजत भाषण करायचं; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अप्रत्यक्ष टोला मारला आहे. निवडणुका नसताना उगाच कशाला भिजत भाषण करायचं अशा शब्दात राज ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेदरम्यान, काही अंध विद्यार्थ्यांनीही हजेरी लावली होती. भाषणापूर्वी राज ठाकरे यांनी त्यांना मंचावर बोलावून स्थान दिलं. आपल्या सभांना हॉल परवड नाही. एसपी कॉलेजलाही विचारलं होतं. तेव्हा त्यांनी कोणालाच जागा देत नाही असं म्हटलं. पण आता आम्हाला नाही तर कोणालाही नाही, असं राज ठाकरे म्हणाले. निवडणुका नाही काही नाही उगाच का भिजत भाषण करा, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांना टोला लगावला.

 राज ठाकरेंचा ‘या’ कारणामुळे अयोध्या दौरा स्थगित 

मला अयोध्येला येऊ देणार नाही, अशा वल्गना काही जण करत होते. मला अनेकांकडून माहिती मिळत होती. पण हा सगळा ट्रॅप होता. आपण या ट्रॅपमध्ये आपण फसायला नको हे माझ्या वेळीच लक्षात आलं. माझा अयोध्या दौरा अनेकांना खुपला. त्याच उद्देशातून अनेकांनी माझ्याविरोधात रसद पोहोचवली. पण मी अयोध्या दौऱ्यावर जाणार… रामलल्लाचं दर्शन घेणार, असे राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. एक कुणीतरी खासदार उठतो आणि तिकडच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, हे शक्या आहे का? याला अनेक पापुद्रे आहेत. मला सगळं सांगणं शक्य नाही.. दौरा रद्द झाल्याने अनेक जण माझ्यावर टीका करतायत… मी शिव्या खायला तयार आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

Share