मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. शाळेत महापुरूषांचे फोटो लावले पाहिजे, त्याऐवजी शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात ? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ
सोमवारी छगन भुजबळ यांनी महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला १५० वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त आयोजित महोत्सवात उपस्थितांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शाळेत महापुरूषांचे फोटो लावले पाहिजे, त्याऐवजी शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात ? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. छगन भुजबळ हे वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत.
देशात अंधश्रद्धा वाढीला लागण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला. यावेळी त्यांनी म्हटलं की, अंधश्रद्धा आणि आमच्या महिला-भगिनींबाबत काही विचारायला नको किंवा काही सांगायला नको. शाळांमध्ये सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. पण सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेबांचा फोटो लावा, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा फोटो लावा. कारण सरस्वतीचा, शारदा यांना आम्ही काही पाहिलं नाही. त्यांनी आम्हाला काही शिकवलं नाही. त्यांनी तीन टक्के लोकांना शिकवले. आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची, असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.