हृता दुर्गुळेही करणार पुढच्या महिन्यात लग्न?

छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरू’ आणि ‘मन उडु उडु झाल’ मालिकांमधून हृता दुर्गुळे घराघरात लोकप्रिय झाली आहे. आपल्या लाघवी सौंदर्यानं आणि अभिनयानं हृतानं प्रत्येकाच्या मनामनात घर केलं आहे. विशेषतः तरुणांच्या मनात हृताचं तर खास स्थान आहे. आता लाखो तरुणांचा हृदयभंग करून हृता तिच्या बॉयफ्रेंड प्रतीक शाह याच्याबरोबर लग्नाच्या बेडीमध्ये अडकणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, हृता दुर्गुळेनं हे वृत्त फेटाळून लावलं आहे.

https://www.instagram.com/p/Cb1k0UPt8Kj/?utm_source=ig_web_copy_link

सोशल मीडियावर तर हृता खूपच लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर हृताचे दोन मीलियनहून फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या हृताचं लवकरच तिचा बॉयफ्रेंड प्रतिक शाह याच्याबरोबर लग्नाच्या बेडीमध्ये अडकणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अर्थात काही महिन्यांपूर्वी हृतानं ती प्रतिक शाहबरोबर रिलेशनमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. तेव्हाच अनेकांचा प्रेमभंग झाला होता.

https://www.instagram.com/p/CcXPYX6Lotc/?utm_source=ig_web_copy_link

त्यानंतर हृतानं प्रतिकबरोबर दणक्यात साखरपुडा केला होता. त्याचे फोटो, व्हिडिओ हृतानं सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावर तिच्या लाखो चाहत्यांनी भरभरून लाईक्स कॉमेन्ट केल्या होत्या. हृता आणि प्रतिक यांचा साखरपुडा झाल्यानंतर हे दोघं लग्न कधी करणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. त्यामुळेच जेव्हा हृता आणि प्रतिक मे महिन्यात लग्न करणार असल्याची बातमी आली, तेव्हा पुन्हा या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.

Share