बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करिश्मा मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. यावेळी करिश्माने सोशल मीडियावरून चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांवर करिश्माने उत्तरं दिली आहेत.
https://www.instagram.com/p/Cc4feT3Lux8/?utm_source=ig_web_copy_link
करिश्माच्या लग्नाची चर्चा ही आलिया आणि रणबीरच्या लग्नानंतर सुरु झाली होती. करिश्माने त्यांच्या लग्नातील एक फोटो शेअर केला होता. या फोटोत तिच्या हातात कलीरा असल्याचे दिसते. तर, पंजाबी लग्नाच्या विधींमध्ये नवरी तिच्या लग्नाच्या बांगड्यांना जोडलेले असे सोन्याचे दागिने घालते. त्यानंतर ती तिच्या बहिणी आणि मैत्रिणींच्या डोक्यावर तिचे हात हलवते आणि जर कलीरा त्यांच्यावर पडला तर तिचं पुढचं लग्न असणार असे म्हटले जाते. त्यामुळे करिश्माच्या लग्नाची चर्चा सुरु झाली होती.
करिश्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून (Ask Me Anything) द्वारे चाहत्यांशी संपर्क साधला होता. यावेळी एका नेटकऱ्याने करिश्माला पुन्हा लग्न करणार का? असा प्रश्न विचारला. याप्रश्नावर करिश्मा गोंधळलेल्या मुलीचा फोटो शेअर करत म्हणाली, विचार करेन. आता करिश्माने दिलेल्या या उत्तरामुळे सगळ्यांना प्रश्न पडला आहे की करिश्मा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे का?