पुण्यात मेळाव्यात मोरेंना खुर्ची मिळेल का ? दिपाली सय्याद यांचं खोटक ट्वीट

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या पुण्यात सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.

सभा रद्द करून कोणताच मुद्दा शेवट पर्यंत मार्गी न लावण्याची परंपरा राज साहेबांनी कायम ठेवली त्याबद्दल खंत आहे. पण पुण्याच्या मेळाव्याला वसंत मोरे यांना खुर्ची मिळेल का हा यांच्या पक्षाचा सर्वात मोठा प्रश्न आहे. अरे खुर्ची द्याल कि नाही! अशा आशयाचं खोचक ट्वीट दीपाली सय्यद यांनी केली आहे.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करण्याची दिपाली सय्यद यांची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही दिवसांपासून त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय झाल्या असून मनसे आणि भाजपवर जोरदार टीका करत आहेत. प्रामुख्याने राज ठाकरे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे दोघे दीपाली सय्यद यांच्या निशाण्यावर आहेत.

Share