तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल, राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल

मुंबई : एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी काल औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावरुन आता वादाला तोंड फुटले आहे. यावरून आता राज्यात राजकारण पेटलं आहे. एमआयएमच्या नेत्यांवर भाजप, शिवसेना आणि मनसेचे नेते टीका करत आहेत.  शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ओवैसी यांच्यावर टीका केली आहे.

संजय राऊत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, संभाजीनगरला वारंवार यायचं आणि औरंजेबाच्या कबरीपुढे आम्हाला सर्वांना, महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकत महारष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचं ओवेसी बंधूचं राजकारण दिस आहे. पण मी इतकंच सांगेन की औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी बांधली आहे. त्याला कबरीत आम्ही टाकलं आहे. तुम्ही कबरीवर येऊन नमाज पठण करत आहात, कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

औरंगजेब काय महान संत नव्हता. त्याने महाराष्ट्रावर आक्रमण केलं, मंदिरं उद्ध्वस्त केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर मराठा योद्ध्यांनी त्याच्यासोबत लढाई लढली आहे. पण आता महाराष्ट्रात येऊन त्याच औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणं हे आव्हान दिल्यासारखं आहे. आम्ही हे आव्हान स्वीकारतो. औरंगजेबाला आम्ही याच मातीत गाडलं होतं आणि औरंगजेबाचे जे भक्त आहेत जे राजकारण करु इच्छित आहेत त्यांचीही हीच स्थिती होईल. महाराष्ट्रातील माती मर्दांची, शुरांची आणि महाराजांची आहे, असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

Share