अभिनेता विकी कौशल विरोधात तक्रार दाखल

मुंबईः विकी कौशल आणि सारा अली खान यांचा आगामी चित्रपट ‘लुका छुप्पी 2’ चित्रपटाचे शूटिंग चालू आहे. हे शुटींग मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये सुरु आहे. या चित्रपटातील एक दृश्य चित्रित करण्यात आले आहे. त्या सीनमध्ये विकी कौशल सारा अली खानला बाईक रस्त्यावर फिरताना दिसत आहे. या बाईकचा नंबर बनावट असल्याचा दावा करण्यात आला आहे. इंदूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने विक्कीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदाराने कारवाईची मागणी केली
तक्रारदार जयसिंग यादव म्हणाले, “चित्रपटात वापरलेला वाहन क्रमांक माझा आहे; चित्रपट युनिटला याची माहिती आहे की नाही हे माहित नाही… हे बेकायदेशीर आहे, परवानगीशिवाय माझी नंबर प्लेट वापरू शकत नाही. याबाबद पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

जयसिंग यादव म्हणाले, ज्याचा क्रमांक MP-09 UL 4872 आहे. त्यानंबरची स्कुटी त्यांनी 25 मे 2018 रोजी एरोड्रोम येथील शोरूममधून विकत घेतली. जे वाहन वापरले जात आहे ते बनावट आहे. चित्रीकरणात वापरलेला दुचाकीचा नंबर त्यांच्या स्कुटीचा आहे.

पोलिस विधान
बाणगंगा येथील एसआय राजेंद्र सोनी यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, “आम्हाला विक्की कौशलविरुद्ध तक्रार मिळाली आहे. या प्रकरणाची चौकशी करून नंबर प्लेटचा गैरवापर झाला की नाही हे पाहिले जाईल. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल. चित्रपटाचे युनिट इंदूरमध्ये असल्यास त्यांचीही चौकशी केली जाईल.

Share