जून मध्ये सरासरीच्या ५४% च पडला पाऊस !

राज्यात मोसमी वाऱ्यांपासून (नैऋत्य मोसमी वारे) पाऊस पड़तो. (वार्षिक सरासरी पर्जन्य : ४०० ते ६००० मि.मी.). किनारी भागात ७ जूनपासून (मृग नक्षत्र) मोसमी पावसाळा सुरवात होते.राज्यात सर्वाधिक पाऊस जुलै महिन्यात पडतो.राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे २०% क्षेत्र अवर्षणग्रस्त आहे. राज्यातील अमरावती, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा आदी जिल्ह्यांना ‘ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून’ पाऊस मिळतो, मात्र या वाऱ्यांपासून मिळणारा पाऊस तुलनेने कमी असतो.एप्रिल-मे महिन्यात राज्याच्या काही भागांत पावसाच्या ‘आंबेसरी’ (आम्रसरी) पडतात. हा पाऊस आंबा पिकास मानवतो.सर्वात जास्त 85% पाऊस हा महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून मुळे भेटतो. ‘आंबोली’ येथे सर्वाधिक पाऊस पडतो म्हणून त्यास ‘महाराष्ट्राची चेरापुंजी’ म्हटले जाते.राज्यात सर्वात कमी पाऊस सातारा जिल्ह्यातील दहीवडी व म्हसवड परिसरात (२९ ते ३० सेमी) पडतो.

तसेच दरवर्षी जुने महिन्यात महाराष्ट्रामध्ये सरासरी १७८.४ मिमी इतका पाऊस पडतो मात्र यावर्षी आलेल्या ‘बिपरजोय ‘ या वादळामुळे २ आठवडे पाऊस लांबला व सरासरीच्या ५४% म्हणजेच ९७.४ मिमी इतकाच पाऊस झाला.

Share