सेना कसे सहन करतेय

डाॅ.मुद्तसीर लांबे यांची राज्याच्या वक्फ बोर्डावर नवाब मलिकांनी सदस्य म्हणून नियुक्ती केली. मात्र हि नियुक्ती कोणी केली यावर वाद सुरु आहेत. या वादावर आता मलिकांच्या मुलीने ट्विट करत ही नियुक्ती देवेंद्र फडणवीसांच्या काळातील आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण वस्तुस्थिती वेगळी आहे. लांबे यांच्या बाबत फडणवीसांनी भाषणात अनेक खुलासे केले आहेत. याआधी लांबेवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि त्यांनी स्वतः आपले संबंध दाऊशी असल्याच संभाषणात सांगितलं आहे. त्यामुळे त्यांचे संबंध अजून कोणाकोणा सोबत आहेत हे बघनं महत्वाचं ठरतं.डाॅ. लांबे राष्ट्रावादीचे कार्यकर्ता आहेत यात शंका नाही. त्यांनी निवडणूक देखील लढवली आहे हे देखईल सुर्य प्रकाशा इतकं स्पष्ट आहे. आघाडीचा धर्म म्हणून शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर आरोप केला म्हणून पाठिशी उभं राहिल. मात्र अजून संजय राऊत यावर बोललेले नाहीत पण इतर नेत्यांनी आपली मते दिली आहे.

शरद पवार यांचे दाऊदशी असलेल्या संबंधावर संजय राऊतांना शिवसेना भवनात पत्रकार परिषद सेना भवनात घेतील यात देखील शंका नाही. याला सेना परवानगी देईल का असा देखील प्रश्न आहे. कारण दाऊद संबंधातील पवारांचे संबंध सेना भवनात खुलासे कारावे हा एक ऐतिहासीक प्रसंग असेल. कादाचित राऊतांनी उध्दव ठाकरेंना विचारले देखील असेल. सेना या विषयामध्ये आक्रमक होतांना दिसत आहे त्यासंदर्भात ते भाजपवर टिका देखील करत आहे. अगदी CMO म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून देखील या संदर्भात ट्विट करत म्हंटल आहे की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसे मुस्लीस कार्यक्रमात हजर राहत होते.खर तर या कार्यालयाचं हे काम असत का ? हा मोठा प्रश्न आहे.

काही दिवसांपूर्वी एक बातमी छापून आली होती. या बातमीत डाॅ.मद्तसीर लांबे या व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला अशी ती बातमी आहे. ज्या महिलेला या अत्याचाराला बळी पडाव लागल ती महिला शिवसेनेच्या वाहतूकसेनेची प्रमुख पदाधिकारी होती. शिवसेनेच्याच महिलेवर डाॅ.लांबे कुकर्म करतो , तीला आपल्या पतीपासून विभक्त करतो , तीच्या पतीवर गुन्हे दाखल होतात. त्याच डाॅ.लांबेच्या मागे शिवसेना उभी राहते यापेक्षा वाईट गोष्ट ती कोणती. संबंध कसे आहेत असा प्रश्न विचारले जातात परंतू शरद पवारांसमावेत डाॅ.मुद्तसीर यांचा फोटो पवारांच्या निवासस्थानी काढलेला आहे. डाॅ.लांबे दाऊदशी असलेले संबंध तो स्वतः कबूल करत आहे. तसेच लांबेंचे संबंध पवारांसोबत देखील आहेत. व्होरा कमिटीच्या अहवालात शरद पवारांवर आरोप करण्यात आले आहेत की, त्यांचे संबंध दाऊद सोबत आहेत.

शरद पवारांना शिवसेनेवर फार असं प्रेम नाही पण देवेंद्र फडणवीसांना सत्ते बाहेर ठेवण्यासाठीचा हा आघाडीचा खेळ आहे. उध्दव ठाकरेंवर मित्राचा मुलगा असं म्हणून प्रेम होतं असं देखील काहीही नाही. पवारांची अजिबात इच्छा नव्हती की आपण सेनेसेबत सत्ता स्थापन करावी. केवळ सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्यासाठी पवारांनी सेनेसोबत हात मिळवणी केली आहे. परंतू शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यावर या डाॅ.लांबेने अत्याचार केले तरी देखील शिवसेना लांबेच्या किंवा राष्ट्रवादीच्या बाजूने का असा सवाल निर्माण होतो.

Share