पंतप्रधानांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा नकार; प्रोटोकॉलच उल्लंघन

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुंबईला येत आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने बऱ्याच कालावधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर येणार आहेत.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या जागी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पंतप्रधानाच्या स्वागतासाठी जातील. मास्टर दीनानाथ प्रतिष्ठान आणि मंगेशकर कुटुंबियांकडून दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारच वितरण आज संध्याकाळी पाच वाजता षण्मुखनंद सभागृहात होईल. प्रोटोकॉल नुसार पंतप्रधान ज्या ज्या राज्यात जातात तिथेले मुख्यमंत्री त्यांच स्वागत करतात

पण ठाकरे या स्वागतासाठी जाणार नसल्याच समोर आल आहे. या मागचे  कारण अजूनही समोर आलेल नाहीये पण शिवसेनेतील बऱ्याच नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणे कडून सतत कारवाया सुरू आहेत. यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंध बिघडले आहेत. युती झाल्यानंतर मित्र झालेले हे दोन पक्ष आता कट्टर शत्रू झाले आहेत. अश्यावेळी मोदी आणि ठाकरे यांच्या व्यासपीठावर होणाऱ्या भेटीकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.

Share