पंतप्रधान मोदींचा पंजाब दौरा अचानक रद्द

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाब दौऱ्यावर असताना सुरक्षेत चूक झाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने ही माहिती दिली आहे. गृह मंत्रालयाने सांगितले की, पंजाबमधील हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किमी अंतरावर पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे दिसून आले. पीएम मोदी १५-२० मिनिटे फ्लायओव्हरवर अडकले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेत ही मोठी चूक होती.

पावसामुळे पंतप्रधान मोदी रस्त्याने हुसैनीवालाला रवाना झाले: गृह मंत्रालय
आज सकाळी पंतप्रधान मोदी भटिंडा येथे पोहोचले, तेथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. परंतु पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे पंतप्रधानांनी हवामान स्वच्छ होण्याची सुमारे २० मिनिटे वाट पाहिली. मात्र, हवामानात सुधारणा न झाल्याने त्यांनी रस्त्याने राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचे ठरले. हा रस्त्याचा प्रवास तब्बल २ तासांचा होता. डीजीपी पंजाब पोलिसांनी आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी केल्यानंतर ते रस्त्याने प्रवास करण्यास निघाला. हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किमी अंतरावर पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे दिसून आले. पंतप्रधान मोदी १५-२० मिनिटे फ्लायओव्हरवर अडकले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेत ही मोठी चूक होती

 

analyser news

 

 

Share