औरंगाबादकरांनो सावधान कोरोना वेशीवर आहे !

**औरंगाबाद-** राज्यात सातत्याने कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत असताना औरंगाबादेत नागरिक मात्र बिनधास्तपणे वावरत आहेत. औरंगाबादेत गेल्या २४ तासात १०३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे औरंगाबादेत तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असे म्हणावे लागेल. प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार सुचना केल्या जात आहेत परंतू नागरिकच निश्काळजीपणे वावरत असल्याने प्रशासन देखील काय करणार.

जिल्ह्यात मंगळवारी १०३ कोरोना रूग्ण आळढले यात शहरातील ८७ आणि ग्रामीण भागातील १६ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात तब्बल सहा महिन्यानंतर रुग्ण संख्येने शंभरी पार केली आहे.यावर प्रशासनाकडून खबरदारी घेत गर्दीच्या ठिकाणांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे आदेश मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यासाठी पथक नेमण्यात आले असून नियमानूसार गर्दी आढळल्यास हाॅटेल, शोरुम्स, माॅल्स, व दूकानांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

Share