देशातील कोरोनाबाधितांमध्ये पुन्हा वाढ, गेल्या २४ तासांत २ हजार ८२८ नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासात २ हजार ८२८ कोरोनाबांंधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १४ बाधितांनी जीव गमावला आहे. गेल्या २४ तासांत २ हजार ०३५ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. यासह देशात आतापर्यंत कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४ कोटी २६ लाख ११ हजार ३७० वर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या आकडेवारीनुसार, सध्या देशात १७ हजार ८७ रुग्णांवर पोहोचली आहे. आदल्या दिवशी हा आकडा १६ हजारांवर होता. देशात गेल्या २४ तासांत 2 हजार ०३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यासह देशात आतापर्यंत कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४ कोटी २६ लाख ११ हजार ३७० वर पोहोचली आहे. सध्या देशात १७ हजार ८७ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. देशातील दैनंदिन कोरोना सकारात्मकता दर ०.६० टक्क्यांवर पोहोचला आहे.

Share