शरद पवारांना नवाब मलिकांपेक्षा संजय राऊत प्रिय- ओवैसी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतात. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करू नका असे म्हणतात. त्यांना तुरुंगात टाकू नका अशी विनंती करतात. मी त्यांना विचारू इच्छितो की, त्यांना त्यांच्याच पक्षातील नवाब मलिक का आठवत नाही, मलिकांना तुरुंगाच्या बाहेर का काढले जात नाही? असा प्रश्न एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी शरद पवारांना विचारला. भिवंडीमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.

शरद पवार हे पंतप्रधानांना भेटले तेव्हा नवाब मलिकांबद्दल बोलायला हवे होते. मात्र, ते शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याबद्दल बोलले. संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी नवाब मलिकांपेक्षा जास्त जवळचे झाले आहे. हा यांचा खरा चेहरा आहे, हे लक्षात ठेवा. मी सत्य समोर ठेवण्याचे काम करतो आहे. मात्र, पत्रकार राजकारण करायला सुरुवात करेल, असेही ओवैसी यावेळी म्हणाले.  नवाब मलिक हे मुस्लिम आहे म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केल जातय. मुस्लिमांना भीती दाखवली की ते आपल्याकडे धावत येईल असे यांना वाटते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही नवाब मलिकांना बाहेर काढण्याबाबत काहीच बोलत नाही. यांना नवाब मलिक का आठवत नाही? निवडणूका आल्या की ओवैसींच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ नका, आपल्याला भाजपला हरवायच आहे. असे म्हणून हे फक्त मुस्लिम नेत्यांचा वापर करुन घेणार असेही ओवैसी यावेळी म्हणाले.

 

Share