नागपुर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सरकराने मोठी घोषणा केली आहे. राज्याचे वैद्यकीय मंत्री गिरीष महाजन यांनी राज्यात लवकरच डाॅक्टर, तंत्रज्ञांच्या जवळपास ४ हजार जागांची भरती करण्यार असल्याची घोषणा विधानसभेत केली आहे.
वैद्यकीय मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, आम्ही एमपीएसच्या माध्यमातून ३०० डाॅक्टर भरले आहेत. सध्या २८ टक्के पदे रिक्त आहेत. यासंदर्भात आम्ही मेडिकल बोर्ड तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून लवकरच पदभरती करण्यात येईल. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. एमपीएससी मार्फत जागा भरण्यास वेळ लागतो असं गिरीष महाजन म्हणाले. तसंच राज्य आतापर्यंत १० टक्के हाॅस्पिटल आणि ९० टक्के हाफकिन अशी औषधे खरेदी होती, मात्र आता हे प्रमाण आम्ही बदलत आहोत. आता ३० टक्के हॉस्पिटल आणि ७० टक्के हाफकिन अशी औषधं खरेदी केली जाईल, अशी माहिती गिरीष महाजन यांनी दिली.
नागपूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे रुग्णांची संख्या मोठी असते. व्हेंटिलेटर तत्काळ उपलब्ध करायची म्हटलं तरी ते शक्य होतं नाही. ही सध्याची वस्तुस्थिती आहे. कारण रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात आहे. लवकरच जास्तीत जास्त व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात येईल असे महाजन म्हणाले.
२०२४ पर्यंत जे जे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल
गिरीश महाजन पुढे म्हणाले, मेडिकल कॉलेज बाबत आपण लवकरच निर्णय घेतोय. अधिक मनुष्यबळासह हॉस्पिटल सुरू करण्यात येतील. तसेच राज्यात १० हजार खोल्या मेडिकल विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलसाठी बांधण्याची गरज आहे. आम्ही सीएसअरच्या माध्यमातुन हा प्रश्न आम्ही मांडत आहोत. २०२४ पर्यंत जे जे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल करत आहोत. तसेच रिचर्ड अँड क्रुडास येथील जागा जी ९९ वर्षाच्या करारावर देण्यात आली होती. त्यांची मुदत २० वर्षांपूर्वी संपली आहे. ती जागा जे जे ला मिळाली तर मोठा फायदा होणार आहे. सध्या हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. अपेक्षा आहे लवकरच निर्णय लागेल असं महाजन म्हणाले.