माझी तुम्हाला विनंती आहे! देशाच्या हितासाठी भारत जोडो यात्रा रद्द करा

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी काॅँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांना पत्र लिहिले आहे. काॅंग्रेसची भारत जोडो यात्रा राजस्थानात पोहोचलेली आहे. अशातच जगभरात कोविडचा पुन्हा उद्रेक झाला असून, केंद्र सरकार सतर्क झालं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहित ‘भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचं पालन करण्याचे आवाहन केले आहे. यात्रेदरम्यान नियमांचं पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबवावी, असे देखील मांडवीय आपल्या पत्रात म्हटले आहे.

कोरोना महामारी ही सार्वजनिक आपत्ती आहे. त्यामुळे देशहितासाठी भारत जोडो यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेता येईल. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत कोरोनाच्या नियमांचे पालन करावे तसेच यात्रेदरम्यान सर्वांनी मास्क आणि सॅनिटायजरटचा वापर करावा. भारत जोडो यात्रेत फक्त कोरोना वॅक्सीन घेतलेल्या नागरिकांना सहभागी होण्याची परवानगी द्यावी.

दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या पत्रानंतर काॅंग्रेसने भाजपवर टिका केली आहे. देशात भारत जोडो यात्रेदरम्यान कॉंग्रेसला मिळणारे प्रेम पाहून भाजप घाबरली आहे असही काॅंग्रेसने म्हटलं आहे.

Share