मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. मोहीत कंबोज यांनी सामान्य नागरिकांचा पैसा असलेल्या दोन-तीन बँकांना चुना लावला आहे, त्यामुळे त्यांच्या ट्वीटला किती महत्त्व दिलं पाहिजे? हे आपण समजून घेतलं पाहिजे असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
जेव्हा मोहिच कंबोज यांनी ट्वीट केले, तेव्हाच मी मोहीत कंबोजबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ओव्हरसीज बँकेत ५२ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा विषय चर्चेत आहे. त्याचबरोबर त्यांनी अजून दोन-तीन बँकांना चुना लावला आहे. सामान्य लोकांचा पैसा ज्या बँकेत असतो, त्याच बँकेला त्यांनी चुना लावला असेल तर त्यांच्या ट्वीटला आपण किती महत्त्व दिलं पाहिजे? हे आपण समजून घेतलं पाहिजे असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टातील निर्णय पुढे ढकलून चालणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. लोकशाहीला आणि संविधानाला धरून निर्णय असला पाहिजे, अशी अपेक्षा रोहित पवार यांन व्यक्त केली. सोलापुरातील राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याची चर्चे आहे. पण, जे लोक एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरुवातीपासून होती त्यांना काहीही मिळालं नाही मात्र उशिरा गेलेल्यांना मंत्रिपदं मिळाली. जास्त भरती केल्याने लोक गुदमरूत आहेत, असा टोला देखील रोहित पवार यांनी लगावला आहे.