मुंबईः काल जाहीर झालेल्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कार नामांकनांमध्ये भारतिय माहितीपटाला स्थान मिळाले आहे. रायटिंग विथ फायर’ या महितीपटाला ऑस्कर पुरस्कार नॉमिनेशन मिळाले आहे. ही भारतीय प्रेषकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. हा माहितीपट रिंटू थॉंमस आणि सुष्मित घोष या दोघांनी मिळून दिग्दर्शित केली आहे. या बरोबरच आणखी चार माहितीपटांची निवडही झाली आहे. ज्यामध्ये एटिकी आणि फ्ली यांचाही समावेश आहे. बेस्ट फिचर फिल्मसाठी जपान, डेनमार्क, इटली, भूतान आणि नॉर्वे देशातील चित्रपटांचा समावेश आहे.
ऑस्कर नामांकनाच्या शर्यतीत जय भिम मरक्कर हे दोन भारतीय चित्रपट होते. हे चित्रपट बाद करण्यात आले.
Presenting the 94th #Oscars Nominations Show. #OscarNoms https://t.co/Zh1c00Anje
— The Academy (@TheAcademy) February 8, 2022
हॉलीवूड अभिनेता बेनेडिक्ट कंबरबॅचची मुख्य भूमिका असलेल्या ‘द पॉवर ऑफ डॉग’ या चित्रपटाला सर्वाधिक १२ नामांकने मिळाली आहेत. वॉर्नर ब्रदर्सची निर्मिती असलेल्या ‘डय़ून’ या चित्रपटाला १० नामांकने मिळाली आहेत. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागात ‘द हँड ऑफ गॉड’, ‘लुनाना: अ याक इन द क्लासरूम’, ‘द वस्र्ट पर्सन इन द वल्र्ड’, ‘ड्राईव्ह माय कार’ आणि ‘फ्ली’ या चित्रपटांना नामांकन जाहीर झाले आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट विभागासाठी ‘बेलफास्ट’, ‘कोडा’, ‘डोन्ट लूक अप’, ‘डय़ुन’, ‘ड्राईव्ह माय कार’, ‘किंग रिचर्ड’, ‘लिकोरिस पिझ्झा’, ‘नाईटमेअर अॅली’, ‘द पॉवर ऑफ द डॉग’ आणि ‘वेस्ट साइड स्टोरी’ या चित्रपटांना नामांकने मिळाली आहेत.
काय आहे कथा
‘रायटिंग विथ फायर’ ही डॉक्युमेंट्री मुळात दलित महिलांची कहाणी आहे. होय, दलित महिला आणि या महिलांद्वारे चालवल्या जाणा’या एका वृत्तपत्राची कहाणी या ९० मिनिटाच्या माहीतापटात दाखवली गेली आहे. ‘खबर लहरिया’ नावाचं वृत्तपत्र हे दलित महिलांद्वारे संचालित होणारं भारतातील एकमेव वृत्तपत्र होतं. उत्तरप्रदेशमधील चित्रकूट जिल्ह्यातील करवी नावाचं एक छोटंस गाव. या गावातील दलित महिलांनी एकत्र येऊन २००० साली एक वृत्तपत्र सुरु केलं. ‘खबर लहरिया’ असं नाव असलेल्या या वृत्तपत्रात दलित महिला पत्रकार बदलता समाज,भ्रष्टाचार, गरिब व महिलांच्या कथा लिहायच्या. बुंदेलखंडी भाषेतील हे वृत्तपत्र २००२ साली चित्रकूटसह बुंदेलखंडच्या अनेक जिल्ह्यात प्रकाशित व्हायचं. याच वृत्तपत्राच्या जन्माची कहाणी ‘रायटिंग विथ फायर’मध्ये दाखवली गेली आहे. या आठ पानाच्या साप्ताहिकासाठी दलित महिला फिरुन बातम्या जमा करतात. समाज व्यवस्थेशी लढत, बंधनांना झुगारत लिहिण्याचं धाडस करतात, याचं चित्रण या माहितीपटात आहे.