वैद्यकीय अस्थायी प्राध्यपकांच्या लातूर येथील आंदोलनाला निलंगेकर यांची भेट

लातूर- राज्यातील १९ वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापक गेली अनेक वर्षे रुग्णालयात कार्यरत असून कोरोना काळातही त्यांना अखंड सेवा दिला आहे. या प्राध्यापकांची सेवा नियमित करण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत दिले होते. परंतु दोन वर्ष झाली तरी यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे ५ जानेवारीपासून या प्राध्यापकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात हे आंंदोलन सुरु असून याठिकाणी आमदार संभाजी पाटिल निलंगेकर यांनी भेट दिली.

संघटनेच्या विविध मागण्या जाणून घेत यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याची आमदार निलंगेकर यांनी ग्वाही दिली. तसेच यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते श्री.प्रविण दरेकर यांच्याशी संपर्क सादत संघटनेच्या मागण्यांबाबत चर्चा केली. यावेळी निलंगेकर यांनी संघटनेला भाजप तुमच्या पाठिशी असल्याचा विश्वास दिला. तसेच सचिवांच्या गैरवर्तन प्रकरणी आगामी अधिवेशनात आवाज उटवत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी करु आणि संघटनेच्या संपूर्ण मागण्या मान्य करुन घेवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी वैद्यकीय शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डाॅ.उदय मोहिते पाटील, संघटनेचे लातूर शहराध्यक्ष डॉ.उमेश कानडे, सचिव डॉ.गणेश बंदखडके,डॉ.शैलेंद्र चव्हाण, डाॅ.डोपे, डॉ.बनसोडे,डॉ.छाबडा, डॉ.होळीकर, डॉ.कंदाकुरे,डॉ.राम मुंडे, डॉ.होळंबे,अन्य वैद्यकीय शिक्षक , भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, भाजपा प्रदेश प्रवक्ता प्रेरणा होनराव, युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, मनपा गटनेते शैलेश गोजमगुंडे, मनपा सभापती दीपक मठपती, नगरसेवक, पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

Share