मुंबई- पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीस ठाण्यात जाण्याची आवश्यकता नाही . असा निर्णय मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी घेतला आहे. पांडे यांनी हि माहिती ट्विटरद्वारे दिली. तसेच या निर्णयाचे पालन होत नसल्यास तात्काळ तक्रा दाखल करा असेही आवाहन त्यांनी ट्विट व्दारे केले आहे.
#PassportVerification. We have decided no citizen will be called to police station in Mumbai except in exceptional cases of documents being incomplete etc. If not followed do report🙏
— Sanjay Pandey (@sanjayp_1) March 12, 2022
पांडे यांनी हा निर्णय जाहीर करताना पासपोर्ट पडताळणीसाठी मुंबईतील कोणत्याही नागरिकाला पोलीस ठाण्यात बोलावण्यात येणार नाही. पण अपवादात्मक स्थितीत नागरिकांना पोलीस ठाण्यात यावे लागेल, असेही पांडे यांनी स्पष्ट केले. तसेच या निर्णयाचे पालन होत नसेल, तर थेट तक्रार दाखल करा, असे आवाहन त्यांनी केले आहे .