गांधी परिवाराच्या राजीनाम्या वर रणदीप सुरजेवाला यांचा खुलासा

नवी दिल्लीः  पाच राज्यांमध्ये झालेला पराभव काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे चित्र आहे. याची जबाबदारी घेऊन सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आपापल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची बातमी काल पासुन मोठ्या प्रमाणात परसत आहे. यावर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी खुलासा केला आहे.

 

पाच राज्यातील पराभवानंतर काँग्रेसचे शिर्ष नेतृत्व असलेल्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे सर्व महत्वाच्या पदांवरून राजीनामा देण्यात असल्याचीही बातमी पसरत आहे. मात्र, ही बातमी पूर्णपणे खोटी आणि तिला कुठलाही आधार नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत स्पष्ट केले आहे.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा मणिपूर आणि पंजाब या राज्यातील दणदणीत पराभवाच्या आघातानंतर अखेर काँग्रेसमध्ये मंथन सुरू झाले आहे. काँग्रेसच्या कार्यकारी समितीची आज संध्याकाळी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बैठक होणारय. मात्र, त्यापू्र्वी त्यांनी काँग्रेस संसदीय दलाची बैठक बोलावलीय. या बैठकीत संसद अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राबाबत चर्चा होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सोमवारी सुरू होतेय. हे अधिवेशन ८ एप्रिलपर्यंत चालेल. या अधिवेशनात पक्ष म्हणून पुढे काय भूमिका घ्यायची याबाबत या बैठकीत चर्चा होणारय. आज रविवारी साडेदहा वाजता ही बैठक सुरू होणार होती. मात्र, ही बैठक सकाळी दहा वाजता सुरू झाल्याचे समजते. बैठकीला सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खारगे, आनंद शर्मा, के. सुरेश आणि जयराम रमेश आदी नेते दिल्लीत १० जनपथ निवासस्थानी पोहचले आहेत. बैठकीबाबत के. सुरेश म्हणाले की, सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र सुरू होणार आहे. त्याबाबत रणनीती ठरवण्यासाठी यावेळी चर्चा होईल.

Share