मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांची मोठी घोषणा

मुंबई-  पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीस ठाण्यात जाण्याची आवश्यकता नाही . असा निर्णय मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी घेतला आहे. पांडे यांनी हि माहिती ट्विटरद्वारे दिली. तसेच या निर्णयाचे पालन होत नसल्यास तात्काळ तक्रा दाखल करा असेही आवाहन त्यांनी ट्विट व्दारे केले आहे.

पांडे यांनी हा निर्णय जाहीर करताना पासपोर्ट पडताळणीसाठी मुंबईतील कोणत्याही नागरिकाला पोलीस ठाण्यात बोलावण्यात येणार नाही. पण अपवादात्मक स्थितीत नागरिकांना पोलीस ठाण्यात यावे लागेल, असेही पांडे यांनी स्पष्ट केले. तसेच या निर्णयाचे पालन होत नसेल, तर थेट तक्रार दाखल करा, असे आवाहन त्यांनी केले आहे .

पासपोर्ट पडताळणीच्या जुन्या प्रक्रियेबाबत अनेक नागरिकांनी  तक्रार केली होती. कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ही प्रक्रिया आणखी किचकट करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुविधेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या घरी येणारा पोलीस अंमलदारच पारपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया करणार आहे.

Share