मुंबई- एमआयएमचे खारदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिल्याचा चर्चा राज्यात जोरदार सुरु आहेत. या फक्त नुसत्या चर्चा आहेत की, खरचं युती होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. परंतू यावर दावे प्रतिदावे केले जात आहे. जलील यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही भेट घेणार आहेत. मात्र या भेटीआधीच उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केल आहे. यावेळी त्यांनी हा एमआयएमचा कट असल्याचं सांगत तो उधळून लावण्याचं आवाहन केलं.
उद्धव ठाकरेंनी बैठकीदरम्यान सांगितलं की, शिवसेनेचं हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवून एमआयएमचा कट उधळून लावा. तसंच यावेळी त्यांनी मेहबुबा मुफ्तींसोबत भाजपाने केलेल्या युतीची आठवण करुन देत म्हटलं की, मेहबुबा मुफ्ती विसरु नका. एक वेळ अशी होती की, ते मुफ्तीसोबत संसार करत होते, आता ते आपल्याला बोलत आहेत.