मुंबई : नुकत्याच देशातील पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत काॅंग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे देशातील काँग्रेसचे नाव मिटल्या जाते का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. यानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आणि चर्चाच्या फेऱ्यांना सुरुवात झाली. देशातील काँग्रेसची एकूण परिस्थिती खालावत चालल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक खळबळजनक ट्विट केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राहुल गांधी द्रष्टे नेते असून २०२४ साली ते पंतप्रधान होतील, असा विश्वास त्यांनी याव्दारे व्यक्त केला आहे.
राहुल गांधी द्रष्टे नेते आहेत. २०२४ साली ते पंतप्रधान होतील.
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 30, 2022
नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी द्रष्टे नेते असून २०२४ साली ते पंतप्रधान होती यात दुमत नाही. सध्या राजकीय वातावरण पाहिले तर अनेक गोष्टी समोर येत आहेत. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणे सुरू आहे. याला आता जनता कंटाळली आहे. काॅंग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्याकडे व्हिजन आहे. २०१९ च्या महामारीची सूचना राहुल गांधींनी आधीच दिली होती, पण त्यांची टिंगलटवाळी केली होती. या देशाला पुढच्या काळात काँग्रेसचं सांभाळू शकते म्हणून मी ट्विट केलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.