मुंबई: उच्च न्यायालयामार्फत संपावर असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल पर्यंत कामावर हजार राहण्याचा आदेश दिला, यानंतर संप मिटल्याचे चित्र निर्माण झाले. शुक्रवारी दुपारी १०० हून अधिक कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या बंगल्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी एसटी आंदोलकांनी जोरदार निर्दशने केली.
या हल्ल्यामागचा सूत्रधार नक्की कोण? याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या हल्ल्याचे राजकीय पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानावर दगड, चप्पलफेक केली. या हल्ल्याचे राजकीय पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत. हल्ल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी काल रात्री १० वाजून १५ मिनीटांनी अटक केली आहे. सदावर्ते यांची मध्यरात्री तब्बल ४ तास मेडिकल चाचणी करण्यात आली. पोलिसांनी सदावर्ते यांना रात्रभर माध्यमांसमोर येण्यापासूनचा रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे.
शुक्रवारी घडलेल्या सर्व घडामोडींनंतर आता ठाकरे सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला असून सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसांच्या पीएसयूवर सोपवण्यात आली आहे. पोलिसांच्या एक वाहनासाहित दोन अधिकारी सुप्रिया सुळे यांच्यासोबत आता तैनात असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी शरद पवार यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यासंबंधीही चर्चा झाली.
महाराष्ट्र केसरी कुस्तीचा आज साताऱ्यात अंतिम सामना आहे. या सामन्याला स्वत: शरद पवार साताऱ्याला उपस्थित राहणार होते, मात्र त्यांना आजचा दौरा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला आहे.