दिल्ली- केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी मॉलला पार्किंग शुल्क आकारण्याचा अधिकार नाही असं मत व्यक्त केल आहे . न्यायालयाने हे वक्तव्य एर्नाकुलम येथील प्रसिद्ध लुलु इंटरनॅशनल शॉपिंग मॉलकडून मोठ्या प्रमाणात पार्कींग शुल्क घेतला जात असल्याने या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेबद्दल सुनावणी दरम्यान केल आहे .
या प्रकरणामधील पुढील सुनावणी २८ जानेवारी रोजी होणार आहे. केरळ उच्च न्यायालयाने कलामास्सेरी नगरपालिकेकडूनही यासंदर्भातील माहिती मागवली आहे. लुलु इंटरनॅशनल शॉपिंग मॉलला पार्किंगसाठी पैसे आकारण्याचा काही परवाना देण्यात आला का ? हे महापालिकेने सांगावे, असं न्यायालयाने म्हटलं आहे . इमारतीच्या बांधकामाच्या वेळी पार्किंग असेल या अटीवरच बांधकामास परवानगी दिली जात असल्याने पार्किंगसाठी पैसे आकारणे चुकीचं आहे, असं मत न्यायलयाने व्यक्त केल आहे .
न्यायमूर्ती पी. व्ही. कुन्हीकृष्णन यांनी मॉल बेकायदेशीरपणे ग्राहकांकडून पार्किंगचे पैसे घेत असल्याचं मत व्यक्त केलं आहे . मात्र न्यायालयाने अद्याप पार्किंग शुल्क आकारणीवर बंदी घालण्याचे आदेश दिलेले नाहीत. पार्किंग हा अनिवार्य भाग असल्याने त्यासाठी शुल्क आकारणे योग्य ठरणार नाही असं न्यायामुर्ती यांनी मत व्यक्त केल आहे . म्हणजेच पार्किंग हा इमारतीचा भाग आहे, म्हणूनच त्यासाठी शुल्क आकारलं जाणं अयोग्य आहे, असं न्यायालयाचं म्हणणं आहे.