प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथावरुन राजकारण तापलं !

दिल्ली-  २६ जानेवारी रोजी राजपथावर होणाऱ्या परेडमध्ये भारतीय सैन्य आणि विविध राज्यातील संस्कृती, कला, चित्रकला, शिल्पकला, संगीत, वास्तुकला, नृत्यदिग्दर्शन यावर आधारित चित्ररथ केले जातात. परंतू या वर्षी भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली असल्याने “आझादी का अमृत महोत्सव” या थीमवर चित्ररथांचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये विविध राज्य आणि केंद्र शासित प्रदेश मिळून २१ चित्ररथांचा सामवेश आहे.

आता या चित्ररथांवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार समोरासमोर आल्याच पाहायला मिळत आहे. भाजप शाषित प्रदेशांच्या चित्ररथाला परवानगी मिळाल्याने परत एकदा भाजप विरूध्द संघर्षाला तोंड फुटले आहे. यातच मुख्यता महाराष्ट्र , तामिळनाडू, पश्चिम बंगाल, बिहार आणि केरळ या राज्यांना चित्ररथासाठी संरक्षण मंत्रालयाकडून परवानगी नाकारली गेली .

सरकारने परेडसाठी निवडलेली अंतिम चित्ररथ यादी अद्याप जाहीर करणे बाकी असताना, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परेडमध्ये २१ चित्ररथ असतील. ज्यामध्ये १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत नऊ विभाग किंवा स्वतंत्र संस्थांची कपात केली  आहे.

चित्ररथ ठरवण्याची प्रक्रिया कधी सुरू होते आणि कोण सहभागी होऊ शकते?

दरवर्षी सप्टेंबरच्या सुमारास संरक्षण मंत्रालय, ज्यांच्यावर प्रजासत्ताक दिनाच्या परेड सोहळ्यासाठी जबाबदारी असते. तसेच सर्व राज्य , केंद्रशासित प्रदेश, केंद्र सरकारचे विभाग आणि काही संवैधानिक अधिकार्यांना या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी चित्ररथाद्वारे आमंत्रित केले जाते.

संरक्षण मंत्रालयाने ८० केंद्रीय मंत्रालये आणि विभाग,  ३६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या सचिवांमार्फत , निवडणूक आयोग , नीती आयोग यांना १६ सप्टेंबर रोजी पत्र लिहून त्यांना सहभागी होण्याचं आमंत्रण दिले होतं. पत्रामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागासाठी चित्ररथाचा प्रस्ताव आमंत्रित करण्याची प्रक्रियाबाबत भाष्य केले होतं. त्यानंतर २७ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करायचा होता तसेच ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रस्तावांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

 

चित्ररथ कसे निवडले जातात?

ही निवड प्रक्रिया विस्तृत असते . संरक्षण मंत्रालयाने कला, संस्कृती, चित्रकला, शिल्पकला, संगीत, वास्तुकला, नृत्यदिग्दर्शन इत्यादी क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींची एक तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे, जी प्रस्तावांमधून चित्ररथ निवडण्यास मदत करते.

ज्या चित्रांमध्ये किंवा डिझाइनमध्ये बदलासाठी सूचना देऊ शकता येतात अशांची तपासणी समितीकडून केली जाते. रेखाटन सोपे, रंगीत, समजण्यास सोपे असावे आणि अनावश्यक तपशील टाळण्यास सांगितले जाते. यामध्ये कोणत्याही लेखी विस्ताराची आवश्यकता नसावी अशीही सूचना केली जाते. चित्ररथामध्ये पारंपारिक नृत्य असल्यास ते लोकनृत्य असावे आणि वेशभूषा आणि वाद्ये पारंपारिक आणि अस्सल असावीत. प्रस्तावात नृत्याचा व्हिडिओ समाविष्ट करावा असेही सांगितले जाते.

एकदा मंजूर झाल्यानंतर, पुढील टप्पा म्हणजे सहभागींनी त्यांच्या प्रस्तावांसाठी त्रिमितीय मॉडेल्स आणणे, जे अनेक निकष लक्षात घेऊन अंतिम निवडीसाठी तज्ञ समितीद्वारे पुन्हा तपासले जातात. अंतिम निवड करताना समिती इतर घटकांसह दृश्य अपील, जनमानसावर होणारा परिणाम, चित्ररथाची कल्पना/ थीम, संगीत सोबत या घटकांचे नियोजन पाहते. समिती ज्यांना निवडले आहे, त्यांनाच पुढील फेरीची माहिती देते. त्यानंतर सहभागाचे निमंत्रण पत्र दिले जाते.

Share