‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘गोलमाल’, ‘सिंघम’ , ‘बोल बच्चन’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘सिंघम रिटर्न्स’ सारखे सुपरडुपर हित चित्रपटांचा दिग्दर्शक रोहित शेट्टी आता ‘सर्कस’ हा नवा चित्रपट घेऊन येत आहे. रोहित शेट्टीच्या या बहुप्रतिक्षित ‘सर्कस’ चित्रपटाचे पोस्टर आता प्रदर्शित झाले आहे. ऐन ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित दाखल होणार आहे.
दिग्दर्शक रोहित शेट्टीचे चित्रपट म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी मनोरंजनाचा डबल डोस असतो. अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स असे सारे काही एकत्र त्याच्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळते. यापूर्वीचा रोहितचा ‘सूर्यवंशी’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता रोहितने ‘सर्कस’ या त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या बिग बजेट चित्रपटामध्ये हिंदीसह मराठी अभिनेत्यांचीही वर्णी लागली आहे. रोहितचा हा नवा प्रोजेक्ट म्हणजे मल्टिस्टारर चित्रपट असणार आहे.
रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘सर्कस’ या त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. “प्रेक्षकांना पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये आणण्याची हीच ती वेळ आहे. ‘सर्कस’ चित्रपट म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी ख्रिसमस गिफ्ट आहे. कारण या सर्कसमध्ये खूप गोलमाल आहे”, असे रोहितने या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना म्हटले आहे. रोहित शेट्टीच्या इतर चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटातदेखील मनोरंजनाचा डबल डोस प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
https://www.instagram.com/p/CdXagkeqmsb/?utm_source=ig_web_copy_link
‘सर्कस’ चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये कलाकार विविध भूमिकेमध्ये दिसत आहेत. तसेच रणवीर सिंगचा यामध्ये डबर रोल असल्याचे दिसत आहे. एक भूमिका अगदी साधी तर दुसरी भूमिका एकदम बिनधास्त असल्याचे दिसून येतेय. तसेच अभिनेता वरुण शर्मा देखील या चित्रपटात डबल रोलमध्ये पाहायला मिळणार आहे. पोस्टरमध्ये इतर कलाकार रेट्रो लूकमध्ये दिसत आहेत. या चित्रपटामध्ये हिंदीमधील टॉपच्या अभिनेत्रीदेखील काम करणार आहेत.
जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून, त्याचबरोबर सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले या मराठी कलाकारांच्याही या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. सोशल मीडियावर या चित्रपटाच्या पोस्टरला चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. हा चित्रपट येत्या २३ डिसेंबरला म्हणजे ऐन ख्रिसमसच्या मोक्यावर बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.
https://www.instagram.com/p/CdXb_JAsCWz/?utm_source=ig_web_copy_link