फोटोसाठी चाहत्याने बळजबरीने धरले अक्षय कुमारचे डोके

आपल्या आवडत्या कलाकारांची झलक पाहण्यासाठी चाहते कधी काय करतील हे सांगता येत नाही. चाहते आपल्या आवडत्या कलाकारांना दूरवर फॉलो करतात आणि काहीही करून त्याच्यासोबत एक फोटो काढू इच्छितात किंवा त्याचा आटोग्राफ घेण्यासाठी धडपतात. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे चाहते जगभर आहेत. सध्या सोशल मीडियावर अक्षय कुमारचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. एका चाहत्याने अक्षय कुमारचे डोके पकडून कॅमेरा त्याच्या तोंडाजवळ घेतो आणि फोटो क्लिक करू लागतो. चाहत्याच्या या कृतीने संतापलेला अक्षय कुमार चाहत्याला काहीतरी बोलत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.

काहीवेळा चाहते सेल्फी घेण्यासाठी मर्यादा ओलांडतात आणि हे विसरतात की, सेलिब्रिटी देखील आपल्यासारखेच माणूस आहेत. अक्षय कुमारच्या या व्हायरल व्हिडीओवरून हेच दिसून येते. अक्षय कुमारचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या चाहत्यांनी घेरलेला दिसत आहे. सोबत अक्षय कुमारचे बॉडीगार्डही पाहायला मिळतात. अक्षयच्या चाहत्यांना त्याला पाहून खूप आनंद झाला आणि त्यांना त्याच्यासोबत हस्तांदोलन आणि सेल्फी घ्यायचे आहेत हे त्या व्हिडीओमध्ये दिसून येतेय. अक्षय त्याच्या चाहत्यांना खूप आनंदात भेटतोय, तेव्हाच असे काहीतरी घडले की, अक्षय कुमार रागावतो.वास्तविक, जेव्हा अक्षय त्याच्या प्रियजनांना भेटण्यासाठी गर्दीतून बाहेर पडतो, तेव्हाच एक चाहता त्याचे डोके पकडून त्याला मागे वळवतो. अक्षय कुमारचे डोके धरून तो कॅमेरा त्याच्या तोंडाजवळ घेतो आणि फोटो क्लिक करू लागतो. चाहत्याच्या या कृतीचा अक्षय कुमारला राग आला आणि तो त्याला हात धरून काहीतरी बोलत असताना या व्हिडीओत दिसत आहे.

नेटीझन्सच्या मजेशीर प्रतिक्रिया
या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले आहेत. ज्यावर लोक मजेशीर प्रतिक्रियाही देत ​​आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले आहे की, ”विमलच्या जाहिरातीनंतर चाहते“, तर दुसर्‍या यूजरने लिहिले आहे की, “एक दूरचा नातेवाईक दिसतो”. तर तिथे दुसरा लिहितो की, “आणि अशा प्रकारे आम्ही QR कोड स्कॅन करतो”. अशा अनेक मजेशीर प्रतिक्रिया या व्हिसीओवर पाहायला मिळत आहेत.

https://www.instagram.com/reel/CcQFK6-J-1n/?utm_source=ig_web_copy_link

Share