जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंना मोठा धक्का

जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजप- शिंदे गटाच्या उमेदवारांनी मुसंडी मारली असून २० जागांपैकी १६ जागांवर भाजप- शिंदे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे.

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवारांनी मुसंडी मारली आहे. २० जागांपैकी १६ जागांवर भाजप शिंदे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर ४ जागांवर महाविकास आघाडीचे उमदेवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीच्या निमित्तानं एकनाथ खडसे यांच्या गडाला सुरुंग लावला आहे. मतमोजणी केंद्राच्या बाहेर भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा जोरदार जल्लोष केला जात आहे.

हा पराभव एकनाथ खडसे यांनी मान्य केली असून विरोधकांनी खोक्याची ताकद लावली आर्थिक बळावर विरोधकांनी ही निवडणूक जिंकली असा आरोप त्यांनी केला आहे. ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती. जिल्ह्यातील राजकारण यामुले तापले होते. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांनी या निवडणुकीत जोरदार ताकद होती.

Share