वर्षातील शेवटच्या संकष्टी चतुर्थीचं महत्त्व काय? जाणून घ्या पूजा आणि चंद्रदर्शन मुहूर्त

संकष्टी चतुर्थीची प्रत्येक गणेशभक्त आतुरतेने वाट पाहत असतो. संकष्टी चतुर्थीला आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजन करण्याचा दिवस असतो. या दिवशी गणेशाची मनोभावे पूजा केल्यास दु:ख दूर होतात, अशी मान्यता आहे. मार्गशीष महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीला म्हणजेच आज ११ डिसेंबर २०२२ महणजेच आज, रविवारच्या दिवशी आली आहे. या दिवशी चंद्राचं पूजनाला विशेष महत्त्व आहे.

संकष्टी गणेश चतुर्थी शुभ मुहूर्त आणि वेळ

यावेळची संकष्टी सायंकाळी ४ वाजून १४ मिनिटांनी सुरु होऊन दुसऱ्या दिवशी १२ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी समाप्त होणार आहे. या संकष्टीला ११ तारखेला, म्हणजे रविवारी रात्रौ ८ वाजून ४० मिनिटांनी चंद्रोदय होणार असून, तेव्हाच चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर उपवास पूर्ण होणार आहे.

संकष्टी चतुर्थी पूजा पद्धत

चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत.

यानंतर पूजास्थानाची स्वच्छता केल्यानंतर गंगेचे पाणी शिंपडावे, त्यामुळे ती जागा पवित्र होईल.

विधीपूर्वक गणेशाची पूजा करा, त्यांना फळे आणि लाडू अर्पण करा.

पूजेनंतर उपवासाचे व्रत घ्या आणि गणेश चालीसा आणि गणेशाचे पठण करा.

त्यानंतर संध्याकाळी चंद्राला अर्घ्य अर्पण करावे.

संकष्टी चतुर्थीला या मंत्रांचा जप करा

“ओम एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दन्ति प्रचोदयात्”
“गजाननम् भूत गणादि सेवितम्, कपित् य जम्भु फलसरा ​​भिक्षितम्, उमसुतम् शोका विनशा करणम्, नमामि विघ्नहेश्वर पद पंकजम्”
“वक्रतुण्ड महाकाय, सूर्य कोटि समप्रभ:, निर्विघ्नम् कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा”

Share