भारत जोडो यात्रेत महाराष्ट्राच्या बड्या नेत्याला धक्काबुक्की, गंभीर जखमी

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र अशात आता भारत जोडो यात्रेत दरम्यान महाराष्ट्रातील एका नेत्यासोबत दुर्दैवी प्रसंग घडला.नितीन राऊत यांची मुलगी दीक्षा राऊत यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

काल हैदराबादमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान माझे वडील बेशुद्ध झाले. त्यांच्या डोक्याला छोटीशी जखम झाली आहे. मला आशा आहे की ते लवकरच बरे होतील आणि महाराष्ट्रात पोहोचल्यावर जनआंदोलनात सामील होईल. असं दीक्षा राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या हैदराबाद येथे सुरू आहे. या यात्रेत राज्याचे माजी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत सहभागी झाले, परंतु अफाट गर्दीत झालेल्या धावपळीत ते पडले, यात त्यांच्या कपाळाला जखम झाली असून पायालाही मुका मार लागला असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी हैदराबाद येथील वासवी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Share