वैजापूर शहरातील मारुती सुझुकीच्या शोरूमला भीषण आग

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर शहरातील मारुती सुझुकीच्या चारचाकी शोरूमला भीषण आग लागली  आहे. नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.  तसेच घटनास्थळी वैजापूर पोलीस देखिल दाखल झाले आहेत. तर घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे.  तर अग्निशमन दलाकडून आता आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र आग भीषण असल्याने आणि आतमधील ऑईलच्या ड्रमने पेट घेतल्याने यासाठी उशीर लागत आहे. सोबतच घटनास्थळी खाजगी पाण्याचे टॅकर बोलवण्यात आले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहे.

शोरूममध्ये विक्रीसाठी  नवीन पा-सहा गाड्या ठेवण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयन्त केले जात आहे. मात्र आग एवढी भीषण आहे की, शोरूममधील सर्वच वस्तू जळून खाक झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शोरूमला आग लागल्याची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली आहे. तर शोरूमला लागेलेली आग विझवण्यासाठी उपस्थित नागरिक प्रयत्न करत आहे.

 

 

Share