आगे आगे देखिए होता है क्या राणेंचा मुख्यमंत्र्याना टोला

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. पाटणकर यांची ठाण्यातल्या निलांबरी प्रोजेक्टमधल्या ११ सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या या सदनिकांची एकूण किंमत ६ कोटी ४५ लाख रुपये इतके असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाई नंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना इशारा दिला आहे.

नारायण राणे ट्विट मध्ये म्हणतात, आगे आगे देखिए होता है क्‍या! महाराष्‍ट्रात भ्रष्‍टाचाराने कळस गाठलाय. जनतेचे शोषण होत आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत. यालाच म्‍हणतात चोराच्‍या उलट्या बोंबा. सव्वा दोन वर्षांत महाराष्‍ट्राच्‍या शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले? त्‍यांच्‍या नशिबी आत्‍महत्‍या! आप्‍तांच्‍या तिजोऱ्यांमध्ये मात्र कोट्यवधींची भर. ही संपत्‍ती कुठून आली? कोणाकडून आणली? शिवसैनिकांच्‍या वाट्याला यातील काहीही नाही. सत्‍ता फक्‍त आपण आणि आपल्‍या नातेवाईकांसाठीच असं टिट्ट करत राणे यांनी मुख्यमंत्र्याना जोरदार निशाणा साधाला आहे.

कोण आहेत श्रीधर पाटणकर?

श्रीधर माधव पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे भाऊ आहेत. श्रीधर पाटणकर हे उद्योजक असून ते डोंबिवलीत राहतात. श्रीधर पाटणकर यांचे वडिल माधव पाटणकर हे देखिल मोठे उद्योजक होते. श्रीधर पाटणकरांच्या ठाणे इथल्या निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिका ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत. पुष्कप बुलियन कंपनीच्या विरोधातील मनी लॉन्ड्रिंग गुन्ह्यात पाटणकर यांचं नाव समोर आलं होतं.

नेमक प्रकरण काय आहे?
२०१७ मध्ये २० ते ३० कोटी रुपये पुष्पक बुलियन कंपनीने नंदकिशोर चतुर्वेदी नावाच्या व्यक्तीला हवालाच्या माध्यमातून वळते केले होते. हवाला रॅकेट चालवणाऱ्या नंदकिशोर तिवारी या व्यक्तीने दोन तीन शेल कंपन्या उभ्या करुन ते पैसे दुसऱ्या कंपन्यांना दिले. त्यानंतर ते पैसे श्रीधर पाटणकर यांच्यापर्यंत पोहचवण्यात आले असा आरोप आहे.

Share