आम आदमी पार्टी आरएसएसमधून उदयास आली- प्रियंका गांधी

पंजाब- पंजाबमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्यात आम आदमी पार्टीने चांगलीच जोरदार तयारी सुरू केली आहे. शेतकरी आंदोलनामुळे भाजला याचा मोठा फटका बसणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी आता आपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

प्रियंका गांधी पंजाबमधील कोटकपुरामध्ये ‘नवी सोच नवा पंजाब’ या रॅलीला संबोधित करतांना म्हणाल्या की, आम आदमी पार्टी आरएसएसमधून उदयास आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दिल्लीत शैक्षणिक आणि आरोग्यसेवांच्या नावावर काहीही नाही. राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांबद्दल सत्य जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.अशी परखड टिका त्यांनी यावेळी केली.

 

Share