भाजपला सत्तेचा मानसिक रोग – पटोले

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार असल्याचं भाजप नेते वारंवार बोलत असतात. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यातील सरकार पडणार असल्याचं वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर आता काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटील यांच्या भविष्यवाणीवरुन टिका केला आहे.

नाना पटोले म्हणाले की, भाजपला सत्तेचा मानसिक रोग झाला आहे. पहाटेचं सरकार झालं तेव्हापासून भाजपचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. सतत असे वक्तव्य करुन राज्याची जनतेची दिशाभूल करत आहेत, असा घणाघात नाना पटोलेंनी केला.


चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते
चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील आघाडी सरकार १० मार्चनंतर जाणार असल्याचं म्हटलं होतं. पोलिसांच्या बदल्यांबाबत माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी त्यांना अनिल देशमुख यांच्याकडून यादी मिळत होती असे सांगितले. तर देशमुख म्हणतात की, त्यांना शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याकडून मिळत होती व ते ती पुढे पाठवत होते. दुसरीकडे आयपीएस अधिकारी परमवीरसिंग यांनी सांगितले की, सचिन वाझे याला पुन्हा नोकरीत घेण्यासाठी त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दबाव आणला होता. या गंभीर आरोपांनंतर आघाडीच्या नेत्यांनी काहीही संवेदनशीलता दाखवली नसली तर ही प्रकरणे गुन्ह्याची आहेत. अनिल देशमुख यांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला तसा या गंभीर प्रकरणांबाबत न्यायालय न्याय देईल. अशी स्थिती निर्माण होईल की, आघाडीच्या नेत्यांना सत्ता सोडून घरी जावे लागेल’, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

Share