बांधकाम अभियंत्याच्या घरासह बँकेत आढळले लाखोंचे घबाड !

औरंगाबाद-  जिल्ह्यातील बांधकाम अभियंत्याच्या घरी आणि बँकेत लाखोंचे घबाड सापडले आहे. या अभियंत्याला ४० हजारांची लाच घेतांना पकड्यात आले आहे. या अभियंत्याचे नाव संजय राजाराम पाटिल असे आहे. त्यांना लाच घेतांना पकडण्यात आल्यानंतर लाचलुपत विभागाने पाटिल यांच्या बँक आणि घराची झाडाझडती घेतली आहे.

लाचलुपतक विभागाच्या माहितीनूसार , सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता संजय  राजाराम पाटिल यांना चार दिवसांपूर्वी ४० हजारांची लाच घेतांना सापळा रचून पकडण्यात आले आहे. त्यांच्या कडून ८५ तोळे सोने, २७ लाख ६५ हजार रुपयांची रोकड आढळून आली आहे. हा मुद्देमाल एसीबीने जप्त केल्याचे पोलिस अधिकक्ष राहुल खाडे यांना सांगितले आहे. यानंतर आता पाटील यांच्या स्थावर मालमत्तांचा शोध घेण्यात येणार असल्याचे लाचलुपत विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Share