आमिर खानकडून नागराजच्या ‘झुंड’च कौतुक

मुंबईः दिग्दर्शक नागराज मंजुळेयांनी बॉलिवूडमध्ये पदारपण केले आहे. नागराज बॉलिवूडमध्ये पहिला चित्रपट झुंड हा बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांच्या सोबत केला आहे. नागराजच्या चित्र बॉलिवूडच्या परफेक्शनिस्टने आमिर खानने एका शब्दात कौतुक केलेय. सध्या आमिर खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल होतोय.

अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेचा एक वेगळा पैलू प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पहायला मिळतो. ‘पिंक’, ‘बदला’, ‘चेहरे’ या अलीकडच्या त्यांच्या चित्रपटांमधील अभिनयाचे कौतुक करायला शब्द अपुरे पडतील. बिग बींनी त्यांच्या करिअरमधील एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यातच आत त्यांच्या आणखी एका भूमिकेची भर पडली आहे. ती म्हणजे ‘झुंड’मधली विजय बारसे यांची. सोनसाखळी चोरणाऱ्या, गांजा विकणाऱ्या, गुंडगिरी करणाऱ्या, झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांची फुटबॉल टीम बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विजय यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट असून नुकतंच आमिर खानसाठी या चित्रपटाच्या खासगी स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होत. हा चित्रपट आणि त्यातील बिग बींचे अभिनय पाहून आमिर अक्षरश: चक्रावला.

काय म्हणाला आमिर खान?
चित्रपटात बच्चनसाहेबांनी अप्रतिम काम केलंय. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक दमदार चित्रपट केले आहेत. पण हा त्यांच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे, असं आमिर यावेळी म्हणाला. आमिरने यावेळी नागराज मंजुळेंचंही तोंडभरून कौतुक केले. गेल्या २०-३० वर्षांत जे आमच्याकडून झाले नाही, ते नागराजने करून दाखवले, तसेच माझ्याकडे काही शब्दच नाहीत व्यक्त होण्यासाठी…तू जो भारतातील तरूणाईच्या भावना ज्या समजून घेतल्यास ना, त्याचे विशेष कौतुक आहे. सिनेमात ज्या मुलांनी काम केलंय. त्याचे देखील विशेष कौतुक. काय सिनेमा बनवला आहे यार? Fantastic.. खूपच युनिक सिनेमा आहे. जी स्पिरिट तुम्ही कॅच केलंय ते लॉजिकने येत नाही. सिनेमाचा एंड रिझल्ट असा आहे की, मी स्पिरिट घेऊन उठतो. हा सिनेमा मला शेवटपर्यंत सोडत नाही. असे अमिर खान म्हणाले.

Share