मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; चार जागीच ठार

मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भरधाव कारने उभ्या ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास ही घटना घडली.
शनिवारी दुपारी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील गहुंजे येथे पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या स्कोडा कारने ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात कारमधील चारही प्रवासी जागीच ठार झाले तर काहीजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अन्य प्रवाशांनीच पोलिसांना अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच हायवे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने मृतदेहांना कारमधून काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून स्कोडा कार भरधाव वेगाने जात होती आणि या कारने ट्रकला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात स्कोडा कारचा पार चुराडा झाला आहे.

Share