मुंबई : गड-किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनाबाबत राज्यभरातील दुर्गप्रेमी तरुणांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले. त्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट आझाद मैदान गाठले. आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.
राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील दुर्गप्रेमी तरुण मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलनाला बसले होते. या आंदोलनकर्त्या तरुणांची भेट घेत संवाद साधून त्यांचे निवेदन स्वीकारले. pic.twitter.com/EtCUwiL0Dh
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 18, 2022
राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील दुर्गप्रेमी तरुणांनी आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनकर्त्या तरुणांशी संवाद साधला. आझाद मैदानात त्यांची भेट घेत निवेदन स्वीकारले. गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका असून त्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाईल, अशी ग्वाहीही दिली. या वेळी खासदार राहुल शेवाळे आणि राज्यभरातून आलेले अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.