अभिनेता रणबीर कपूरच्या कारला अपघात; रणबीर सुखरूप

मुंबई : बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर हा त्याच्या ‘शमशेरा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निघाला असताना त्याच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात रणबीर कपूरच्या कारचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने रणबीरला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही.

रणबीर कपूर सध्या ‘शमशेरा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यशराज फिल्मच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘शमशेरा’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. करण मल्होत्रा दिग्दर्शित ‘शमशेरा’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसह संजय दत्त, वाणी कपूर हे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या फर्स्ट लूक आणि टीझरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमाचे प्रमोशनही दणक्यात सुरू आहे. नुकताच या चित्रपटा चा ट्रेलरही लॉन्च झाला आहे. ‘शमशेरा’ चित्रपटाचे पोस्टर गेल्या आठवड्यात रिलीज झाले. या चित्रपटाच्या टीझरनेही प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच चाहत्यांच्या उड्या पडल्या आहेत. काही वेळातच या ट्रेलरला सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.

रणबीर कपूर आज (२४ जून) ‘शमशेरा’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉचिंगसाठी निघाला होता. ज्या मॉलमध्ये हा कार्यक्रम होता त्या मॉलसमोर रणबीरची कार थांबली होती. अचानक एका कारने त्याच्या कारला धडक दिली. त्यात सुदैवाने रणबीरला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. मात्र, रणबीरच्या कारची काच फुटली असून, कारचे बरेच नुकसान झाले आहे. कारला अपघात झाला तरी रणबीरने ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत तो ‘शमशेरा’च्या ट्रेलर लॉचिंगसाठी हजेरी लावली.

रणबीर कपूरने या अपघाताची माहिती देताना म्हटले आहे की, मला आज ‘शमशेरा’च्या ट्रेलर लॉचिंगसाठी जायचे होते. मी माझ्या वेळेत त्या मॉलसमोर थांबलो होतो. अचानक एका कारने माझ्या कारला धडक दिली. त्यात माझ्या कारची काच फुटली आहे. माझे सुदैव की, मला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. मात्र, त्या अपघाताने मी चांगलाच घाबरून गेलो आहे. अपघातानंतर आम्ही तातडीने ‘शमशेरा’च्या ट्रेलरच्या कार्यक्रमाला मार्गस्थ झालो.

सुदैवाने मला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. गाडीची काच फुटली आहे. यापेक्षा जास्त काही नुकसान नाही. मला ‘शमशेरा’बाबत कमालीची उत्सुकता आहे. मी संजय दत्त यांचा मोठा फॅन आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली आहे. त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठीदेखील खास आहे. आजचा दिवस माझ्यासाठी मोठा आहे. शेवटी बहुप्रतीक्षित अशा ‘शमशेरा’चा ट्रेलर प्रदर्शित होतो आहे याचा आनंद आहे, असे रणबीर कपूरने सांगितले.

Share