अभिनेत्री एंड्रिला शर्माचे हृदयविकाराच्या धक्काने निधन

नवी दिल्ली : अभिनेत्री एंड्रिला शर्माचे हृदयविकाराच्या धक्काने निधन झाले. तिने वयाच्या २४ व्या वर्षी कोलकातामधील एका खाजगी रुग्णालयात एंड्रिला शर्माने अखेरचा श्वास घेतला. एंड्रिलाच्या निधनाने बंगाली, बॉलिवूडसह अनेक कलाकारांमध्ये शोककळा पसरली आहे.

एंड्रिला शर्मा हिला १ नोव्हेंबरला ब्रेन स्ट्रोक आला. यानंतर एंड्रिला शर्माची प्रकृती बिघडली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर, १४ नोव्हेंबर रोजी अँड्रिलाला हॉस्पिटलमध्ये मल्टिपल कार्डिॲक अरेस्ट आले, ज्यामुळे अँड्रिलाची तब्येत आणखी खालावली. अँड्रिलानं कोलकातामधील नारायण सुपरस्पेशलिटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

कोण आहे एंड्रिला शर्मा?
एंड्रिला शर्मा ही मुर्शिदाबादची आहे. तिने २००७ मध्ये ‘झूमर’ या टीव्ही शोमधून पदार्पण केले होते. यानंतर तिने जियो काथी, जिबोन ज्योति अशा अनेक शोमध्ये काम केले. एवढेच नाही तर तिने भगर सारख्या वेब सीरिजमध्येही काम केले आहे. सोशल मीडियावर तिचे खूप चाहते आहेत.

एंड्रिलाचं अभिनयक्षेत्रात काम करण्याचं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने खूप मेहतनदेखील घेतली. मात्र या प्रवासात तिला तिच्या आरोग्याची साथ मिळाली नाही. अँड्रिलाच्या निधनावर बंगाली कलाविश्वातून शोक व्यक्त होतोय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीसुद्धा अँड्रिलाच्या निधनावर शोक व्यक्त केला.

Share