अभिनेत्री मौनी रॉय अडकली लग्नबंधनात

गोवाः छोट्या पडद्यावरील मालिकामध्ये काम केल्यानंतर बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मौनी रॉय लग्नबंधनात अडकली. तिने तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत आज लग्नगाठ बांधली आहे. २०१९मध्ये मौनी सूरजला पहिल्यांदा दुबईत एका पार्टीमध्ये भेटली होती. त्यानंतर त्या दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरूवात केली.

अलाखो दिलांची धडकन आणि सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडिंगवर असणारी बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयनेक वर्षा पासून सूरजला डेट करत होती. पण मौनीने तिच्या आणि सूरजच्या नात्याबद्दल कोणतीही माहिती दिली नव्हती. मौनी आणि सूरज यांचं हे शाही लग्न एक डेस्टीनेशन वेडिंग आहे. या दोघांनीही दुबईत नव्हे तर गोवा डेस्टिनेशन वेडिंग करण्याचे ठरवले आहे. या लग्न सोहळ्याला या दोघांच्या कुटुंबातील लोक आणि त्यांचे मोजके मित्रमंडळी उपस्थित असतील.

कोण आहे सूरज नांबियार ?
सूरजचा जन्म कर्नाटकमधील बंगळूरूमध्ये झाला. तो दुबईमधील प्रसिद्ध बँकर आणि बिझनेसमॅन आहे. सूरजनं जैन इंटरनॅशनल रेजिडेंशियल स्कूलमधून शिक्षण घेतले. २००८ मध्ये त्याने बंगळूरूमधील आरवी कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये सिव्हिल इंजीनियरिंगच्या कोर्ससाठी अॅडमिशन घेतले होते. सूरजला ट्रॅव्हल करायला आवडते. सूरजचा भाऊ नीरज नांबियार हा पुण्यामधील इव्हेंच मॅनेजमेंच कंपनीचा को-फाऊंडर आहे.सूरज हा अशोका इंडिया कंपनीमध्ये इंटर्न आहे. तो संयुक्त अमीरातमध्ये कॅपिटल मार्केट्सचा डायरेक्टर आहे. तसेच तो चार्टर्ड अल्टरनेटिव इन्वेस्टमेंट एनालिस्ट असोसिएशनचा सदस्य देखील आहे.

Share